भोसरी उड्डाणपुलाखाली पार्क केलेली दुचाकी चोरीला

0
245

भोसरी, दि. ५ (पीसीबी) – भोसरी उड्डाणपुलाखाली उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना 28 जून रोजी उघडकीस आली.

याबाबत एका महिलेने रविवारी (दि. 4) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी पहाटे पावणेसहा वाजता महिला फिर्यादी यांनी आपली 20 हजार रुपये किंमतीची (एम एच 14 / एफ एफ 5283) ही दुचाकी भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाच्या समोर भोसरी उड्डण पुलाखाली उभी केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.