पुण्यासह राज्यातील विविध मार्गांवरील गाड्या रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय

0
470
मुंबई, दि.१८ (पीसीबी) – मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर या विभागांमधून धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पुणे-मुंबई, पुणे-अजनी, मुंबई-नागपूर, मुंबई-निजामुद्दीन आदी मार्गांवरील सुमारे २३ गाड्या रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
राज्यातील ‘करोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवण्याबरोबरच पुण्यासह राज्यातील विविध मार्गांवरील गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 
या गाड्या होणार रद्द
१८ ते ३० मार्च – पुणे-मुंबई डेक्कन एक्‍स्प्रेस
१८ ते ३१ मार्च – मुंबई-पुणे प्रगती एक्‍स्प्रेस, कलबुर्गी-सिकंदराबाद एक्‍स्प्रेस
१९ ते ३१ मार्च – मुंबई-पुणे डेक्कन एक्‍स्प्रेस
१९ मार्च ते एक एप्रिल – पुणे-मुंबई प्रगती एक्‍स्प्रेस
२० आणि २७ मार्च – अजनी-एलटीटी एक्‍स्प्रेस
२० आणि २७ मार्च – नागपूर-पुणे एक्‍स्प्रेस
२१ आणि २८ मार्च – लोकमान्य टिळक टर्मिनस-निजामाबाद एक्‍स्प्रेस, पुणे-अजनी एक्‍स्प्रेस
२२ आणि २९ मार्च – निजामाबाद- लोकमान्य टिळक एक्‍स्प्रेस, अजनी-पुणे एक्‍स्प्रेस
२३ आणि ३० मार्च – एलटीटी – अजनी एक्‍स्प्रेस
२६ मार्च आणि दोन एप्रिल – पुणे-नागपूर एक्‍स्प्रेस