कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना ४ एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश

0
537
मुंबई, दि.१८ (पीसीबी) – कोरेगाव भीमा  हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयोगाकडून समन्स बजावण्यात आले असून ४ एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश ही त्यांना देण्यात आले.
२०१८ रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची कारणं आयोगाकडून तपासली जात असून या पार्श्वभूमिवर शरद पवार यांना हे समन्स बजावण्यात आले आहे.
कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करत असलेल्या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी याआधी शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार असल्याचे सांगितले होते. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांची साक्ष नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.