पुण्यात पावसामुळे हाहाकार ; १२ जणांचा मृत्यू, मदतकार्य सुरू

0
514

पुणे, दि.२६ (पीसीबी) – पुणे शहरावर पावसाच्या रूपाने बुधवारी संकटच ओढवले. मंगळवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री रौद्रावतार धारण केला. सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. तर मनुष्यहानीसह जनावरंही दगावली आहे. पाण्याच्या वेगात कात्रज भागात पन्नासहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहून गेल्या आहेत. मदतकार्य मोहिमेदरम्यान एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाला आणखी सिंहगड परिसर आणि सहकार नगरात दोन मृतदेह सापडले होते. त्यानंतर मृतांचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात पावसामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, चार जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.