पुण्यातील ७० टक्के जनता माझ्या बाजूने; भाजपच मला लोकसभेचे तिकीट देईल – संजय काकडे

0
512

पुणे, दि. २४ (पीसीबी) –  पुणे शहरात मी इतके पेरले आहे की, भाजपने जर आज एखादे सर्वेक्षण केले, तर त्यांच्याही लक्षात येईल की, पुण्यातील  ७०  टक्के जनता माझ्या बाजूने आहेत. पुण्यात जे उमेवार आहेत, त्यामध्ये मला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळेल.  त्या आधारावर मला पुण्यातून लोकसभेचे तिकीट मिळू शकते, असे भाजपचे सहयोगी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना काकडे म्हणाले की, मी केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपमध्ये आहे. परंतु माझ्याच पक्षातील काही लोक माझ्याविरोधात षडयंत्र रचतात. मुख्यमंत्र्यांचे कान भरतात. त्यामुळे मला अनेकदा अडचण होते. मात्र, भाजपच मलाच पुण्यातून लोकसभेचे तिकीट देईल, असा विश्वासही काकडे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काकडे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच काकडेंची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढत चालली आहे. त्यामुळे काकडे भाजपला रामराम करुन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशा चर्चादेखील  सुरू झाली  आहे. पण अद्यापही  भाजप आपल्यालाच लोकसभेचे तिकीट देईल, असा विश्वास  काकडे यांना आहे .