तळवडेमध्ये अल्पवयीन मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार

0
1057

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – गोडबोलून घरी नेऊन एका नराधमाने अल्पवयीन मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रुपीनगर, तळवडे येथे घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संजय सत्यवान उतेकर (वय २७, रा. रुपीनगर, तळवडे) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मूकबधिर अल्पवयीन मुलगी आणि आरोपी संजय उतेकर हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मंगळवारी (दि.११) रात्री आठच्या सुमारास मुलगी तिच्या घरी एकटीच होती. यावर आरोपी संजय ने तिला गोडबोलून त्याच्या रुपीनगर येथील घरी नेले. तेथे त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीने ही बाब तिच्या आई-वडिलांना सांगितली. यावर मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात धाव घेऊन संजय विरोधात तक्रार दाखल केली. चिखली पोलीसांनी संजयला अटक केली आहे. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.