पुण्यातील किरकोळ व्यापार आजपासून तीन दिवस बंद

0
562
पुणे, दि,१७ (पीसीबी) – पुण्यातील घाऊक आणि किरकोळ व्यापार आजपासून तीन दिवस बंद राहणार.किराणा, दूध, भाजीपाला वगळून, घाऊक आणि रिटेल व्यापारांची दुकाने बंद ठेवण्यात येतील.पुण्यातील व्यापारी महासंघाने हा निर्णय घेतला आहे. महासंघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी ही माहिती दिली.
किराणा, भाजीपाला, दुध आणि मेडिकलची दुकानं सरू राहणार आहेत. जीवनश्यक वस्तू वगळण्यात सर्वसामान्यांना दिलासा आहे. मात्र नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा नागरिकांनी काळजी घेणे जरूरी आहे.असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पुण्यातील दुकानांबाबत गुरूवारी पुन्हा बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. असं महासंघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी सांगितले.