पुणे शहराची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने

0
298

पुणे, दि. २७ (पीसीबी) – पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 588 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 921 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 33 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 11 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 996 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,68,129 इतकी आहे. तर पुण्यात 7990 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8148 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,51,991 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 8193 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखीन कमी व्हायला हवी.