पुणे विमानतळावर डोक्याच्या विगमध्ये लपवून आणलेले ३१ लाखांचे सोने जप्त

0
630

पुणे, दि. ८ (पीसीबी) – दुंबईवरून डोक्यावर घातलेल्या विगमध्ये लपवून आणलेले ३१ लाखांचे ९५७.१० गॅ्रम सोने सीमा शुल्क विभागाने जप्त केले आहे. ही कारवाई सोमवार (दि.१०) पुणे विमानतळावर करण्यात आली.

शेहजाद बाबा मिया मोमीन (वय ३४, रा. मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर कस्टम अ‍ॅक्ट १९६२ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी मोमीन हा दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या आयएक्स २१२ या विमानाने पुणे विमानतळावर उतरला. त्या वेळी सीमा शुल्क विभागाला त्याच्या संशयास्पद वागण्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याने डोक्यात घातलेल्या विगमध्ये ३१ लाखांचे ९५७.१० गॅ्रम सोने आढळून आले. सीमा शुल्क विभाच्या अधिकाऱ्यांनी ते सोने जप्त करुन शेहजाद याला अटक केली आहे.