पुणे महापालिकेचा ‘तो’ प्रशासकीय अधिकारी लाच घेताना रंगेहात सापडला

0
281

पुणे, दि.१६ (पीसीबी) : पुणे महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यास 50 हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सुरू असून, कारवाईचे कारण मात्र समजू शकलेले नाही. पुणे महापालिकेच्या अधिकार्‍यास लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने प्रंचड खळबळ उडाली आहे.

सहाय्यक प्रशासकीय शिवाजी मोरमारेअसे पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कारवाई सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी मोरमारे हे शालेय शिक्षण विभागात सहाय्यक प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी 50 हजाराची लाचेची मागणी केली होती. त्याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सापळा कारवाई करण्यात आली आहे. त्यांना नुकतीच 50 हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. यामुळे पालिकेत खळबळ उडाली आहे. काही दिवसांपुर्वीच पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकार्‍याला देखील लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. काही दिवसांच्या अंतरावर सलग अ‍ॅन्टी करप्शन विभागाने पुणे महापालिकेतील दोन अधिकार्‍यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.मनपाच्या अधिकार्‍यांची खाबुगिरी मोठया प्रमाणावर सुरू असल्याचे झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी अन्यथा टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी असे आवाहन पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.