पुणे पोलीस आयुक्तांचे अधिकृत ‘सीपी पुणे सिटी’ ट्विटर अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न

0
243

पुणे, दि. ८ (पीसीबी) : पुणे पोलीस आयुक्त यांचे अधिकृत ‘सीपी पुणे सिटी’ ट्विटर अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर तातडीने अकाऊंट पुन्हा ‘एक्टिव्हेट’ झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीकडे या ट्विटर हँडलची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याच्याकडून चुकीने वेगळ्या प्रकारचा मेसेज व्हायरल झाल्याचे पोलीस प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आले. यानंतर थोड्या वेळाने पुन्हा अकाउंट सुरू झाले आहे.