पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम, पण…

0
527

पुणे, दि. ४ (पीसीबी) – : राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वर्चस्व कायम राखले आहे. जिल्हा बँकेच्या संचालकापदाच्या निवडणुकीत 21 पैकी 14 जागा आधीच बिनविरोध निवडून आल्यात. तर सात पैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीची मतमोजणी आज झाली. यावेळी सात पैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा बँकेवर आपली सत्ता काबीज केली आहे.
सुनील चांदेरे, आमदार अशोक पवार, विकास दांगट अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची नावे आहेत तर बिनविरोध निवडून आलेल्या 14 संचालकांपैकी 13 संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. दरम्यान, या निवडणुकीत भाजप पाठिंब्याने एक सदस्य निवडून आला आहे. हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. बँक पतसंस्थांच्या गटामधून भाजप पुरस्कृत प्रदीप कंद 11 मतांनी विजयी झाले आहेत.
जिल्हा बँकेवर अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. पतसंस्था गटातून भाजपचे प्रदीप कंद विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादीचे सुरेश घुले यांना पराभूत केले. फितुरांना जागा दाखवा अजित पवार यांनी आवाहन केले होते. प्रदीप कंद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहे. अजित पवार यांनी निवडणूक प्रतिष्ठेची होती. आता घुले यांचा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागणार आहे.