पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस, पुणे व सातारला रेड अलर्ट

0
575

पुणे, दि. १७ (पीसीबी) –  पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर जास्त राहणार असल्याचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅनेजमेंटचे निवृत्त शास्त्रज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रायगड, पालघर मध्येही मुसळघार पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबईसह पुणे, कोकण, कोल्हापूर, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे, अशी माहिती जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिली आहे. तसेच जीवनप्रकाश यांनी काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा तर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्या 20 आणि 21 ऑगस्टपासून पावसाचा जोर काहीसा कमी होईल. त्याशिवाय राज्यातील धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

विदर्भात 17, 18 आणि 19 तारखेला पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच मराठवाड्यातही पुढील आठवडाभर पाऊस पडणार आहे. मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरूपाचा 40 ते 60 मिलीमीटर पाऊस पडणार असल्याची माहिती आहे.

पुणे आणि साताऱ्यात सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागातील एका आधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुणे आणि साताऱ्याशिवाय मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागानं २४ तासांत कमीतकमी २०४.५ मिमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या आधिकाऱ्यानं प्रसारमाध्यमांना सांगितलं की, ‘‘पुणे, कोल्हापूर, सतारा आणि सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील सोमवारपासून मुसळधार पावासाचा अंदाज आहे. सातारा आणि पुण्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.’’