पी. व्ही. सिंधूच्या बायोपिकमध्ये दीपिका ?

0
301

मुंबई, दि. २६ (पीसीबी) –  भारताची नवी ‘फुलराणी’ असलेल्या पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या विश्वात सुवर्णाक्षरांनी लिहावी अशी कामगिरी केली. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. सुवर्णपदकाबद्दल तिचे अनेकांनी अभिनंदन केले. परंतू अभिनेता सोनी सूद यांने सिंधूला दिलेल्या शुभेच्छा खास आहेत. कारण सोनू सिंधूच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती करत आहे.

सोनू सूद मागील काही दिवसांपासून या चित्रपटाची तयारी करतोय. चित्रपटाचे नाव ‘सिंधू’ असे आहे, अशी चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे शुटिंग लवकरच सुरू होणार होते. मात्र, जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकवल्यानंतर चित्रपटाची संहिता बदलण्यात येणार आहे.

‘एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती करत असताना सर्वात अवघड असते ते म्हणजे लिखाण आणि त्यातील कलाकारांची निवड. संहिता तयार आहे. सिंधूवर चित्रपट बनवायचा असल्याने प्रत्येक गोष्टीत न्याय व्हायला हवा’ असे सोनूने म्हटले आहे.