…तर विधानसभा निवडणुकीत एकाही गावात फिरू देणार नाही – राजू शेट्टी

0
603

कोल्हापूर, दि. २६ (पीसीबी) – विधानसभेपूर्वी सर्व बाबी अंमलात आणून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम करावे,  अन्यथा विधानसभा निवडणुकीत एकाही गावात फिरू देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. गडहिंग्लज येथे शासकीय विश्रामगृहात  घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते.

शेट्टी म्हणाले की, पुनर्वसनाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी विधानसभेच्या आचारसंहितेची कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून या निवडणुका पुढे ढकलाव्यात.  सरकार केवळ पूरग्रस्तांवर घोषणांचा वर्षाव करत आहे.

पाच हजारांची मदत देण्यासाठीही राज्य सरकारकडे पैसे उपलब्ध नाही. केवळ घोषणा करुन तात्पुरती मलमपट्टी करुन विधानसभा निवडणुका लढण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. अतिवृष्टीबाबत शासकीय यंत्रणेने कोणतीच कल्पना  लोकांना दिली नाही. जलसंपदा विभागाकडून पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने झाले नाही, अशी टीका शेट्टी यांनी केली.