पीडितेच्या मृत्यूनंतर रोहित पवारांनी केले आवाहन

0
429

महाराष्ट्र, दि.१० (पीसीबी) – हिंगणघाटमध्ये एका प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळण्याची घटना घडली. या घटनेने महाराष्ट्र हादरला. तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या सात दिवसांपासून पीडिता मृत्यूशी झगडत होती. डॉक्टरांचे पथक अहोरात्र धडपड होते. पण, सोमवारची सकाळ उजाडली अन् पीडितेची प्राणज्योत कायमची मालवली. हिंगणघाटमधील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सगळीकडं हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त करत नागरिकांना आवाहन केले.