पीएमपी बसच्या धडकेत तरुणाने गमावला जीव.. वाचा नक्की काय झालं

0
187

पिंपरी, दि. 28 (पीसीबी) : पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणा-या पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 26) रात्री साडेदहा वाजता जुना पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे घडली.

नितीन भीमराव घिगे (वय 25, रा. शेलद घिगेवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या पादचारी तरुणाचे नाव आहे. याबाबत सचिन भीमराव घिगे (वय 30) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी पीएमपी बस चालक दत्तात्रय मधुकर आंबेकर (वय 47, रा. शरदनगर, मोरेवस्ती, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेदहा वाजता मयत नितीन घिगे जुना पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी चौकाजवळ रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या पीएमपी बसने त्यांना धडक दिली. त्यात नितीन गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.