मॉर्निंग वॉकला जाणे महिलेला पडले महागात…. प्राधिकरणामध्ये महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

0
174

पिंपरी, दि. 28 (पीसीबी) : सकाळच्या वेळी चालण्यासाठी गेलेल्या महिलेचे दोन अनोळखी चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना 6 डिसेंबर रोजी प्राधिकरण निगडी येथे घडली असून याबाबत 27 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्षी दिनेश मडके (वय 44, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साक्षी या 6 डिसेंबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. सकाळी साडेसहा वाजता प्राधिकरण निगडी येथील तुळजाई बंगल्याजवळ आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी साक्षी यांच्या गळ्यातील 3 ग्रॅम वजनाचे 12 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत