पिंपळेसौदागर चषक फुटबॉल स्पर्धेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

0
648

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि कॅनॉन फुटबॉल क्लबच्या वतीने पिंपळेसौदागरमध्ये आयोजित पिंपळेसौदागर चषक फुटबॉल स्पर्धेचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते बुधवारी (दि. २३) उद्घाटन करण्यात आले.

ही स्पर्धा पिंपळेसौदागरमधील कै. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर आयोजित केली असून, २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला नगरसेविका निर्मलताई कुटे, उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, भानुदास काटे, शेखर कुटे, जयनाथ काटे, भूषण काटे, निलेश कुंजीर, विजय भिसे, विजय जाचक, धनंजय भिसे, बाळासाहेब काटे, अशोक देशपांडे, सागर काटे, संतोष काटे, प्रविण कुंजीर, गणेश झिंजुर्डे, किरण काटे, समीर काटे, गौरव काटे, सौरभ काटे, कॅनॉन फुटबॉल क्लब अध्यक्ष नितेश जगताप, प्रशिक्षक सागर रसाळ, सुरज मोहिते, अक्षय वाघचौरे, प्रविण जगताप, किरण राऊत आदी उपस्थित होते.

नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, “क्रिकेट, कबड्डी, टेनिस यांसारख्या खेळांच्या तुलनेत फुटबॉल या खेळाविषयी आपल्या देशात उत्सुकता आणि लोकप्रियता कमी दिसून येते. फुटबॉलसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाला वाव देण्यासाठी जगोजागी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करणे गरजेचे आहे. क्रिकेट, बॅडमिंटन, बॉक्सिंग, बुद्धिबळ, हॉकी, कबड्डी, कुस्ती, टेनिस व इतर अनेक खेळामध्ये जागतिक पातळीवर आपल्या देशाने प्रभुत्व मिळवले आहे. परंतु फुटबॉल हा एक मात्र असा खेळ प्रकार आहे जे आपल्या देशातच पिछाडीवर असून मोजक्याच ठिकाणी खेळला जातो. सचिन तेंडुलकर, मेरी कोम, सायना नेहवाल, विश्वनाथन आनंद, अनुप कुमार यासारख्या अनेक खेळाडूंनी आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठले. परंतु फुटबॉल सारख्या खेळामधून एकही खेळाडू राष्ट्रीय पातळीवर सुद्धा उदयास न येणे ही एक शोकांतिकाच असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच पिंपळेसौदागरमधील लहान मुले व युवकांमध्ये फुटबॉलविषयी आवड निर्माण होण्यासाठी कै. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणामध्ये लवकरच फुटबॉल ग्राऊंड विकसित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.”