निगडी ओटास्किम येथे तरुणावर कोयत्याने वार

0
1767

निगडी, दि. २४ (पीसीबी) – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन दोघाजणांनी मिळून एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवार (दि.२२) रात्री पावनेअकराच्या सुमारास  निगडी ओटास्किम येथील दळवीनगर पीएमपीएमएल बसस्टॉपससमोर घडली.

गणेश दत्ता लकडे (वय १९, दळवीनगर पत्राशेड, ओटास्किम, निगडी) असे कोयत्याचे वार होऊन जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डॅनी उर्फ जाकीर पठाण (रा. ओटास्किम, निगडी) आणि त्याचा साथीदार बिब्या या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावनेअकराच्या सुमारास जखमी गणेश हा त्याच्या मित्रासोबत दळवीनगर पीएमपीएमएल बसस्टॉपससमोर बोलत बसला होता. यावेळी आरोपी डॅनी उर्फ जाकीर आणि त्याचा साथीदार बिब्या तेथे आले. त्यांनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन गणेश याला मारहाण केली. तसेच डॅनी याने कोयत्याने गणेश यांच्या डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी डॅनी आणि बिब्या या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक ओव्हाळ तपास करत आहेत.