पिंपळेनिलखमध्ये स्वरारंभी स्कूल ऑफ म्युझिकच्या वतीने वार्षिक संगीतोत्सव उत्साहात

0
962

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – पिंपळेनिलख, जगताप डेअरी येथील स्वरारंभी स्कूल ऑफ म्युझिकच्या वतीने वार्षिक संगीतोत्सव भरवण्यात आला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे गायन व वादन झाले.

किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पंडित यादवराज फड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वरारंभी स्कूल ऑफ म्युझिकचे संस्थापक तुषार रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी नगरसेविका आरती चोंधे, नगरसेवक तुषार कामठे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर राग अल्हेय्या बिलावल, यमन, बागेश्री,  भीमपलास, खमाज या रागांमधील बंदिश आणि त्यावर आधारित चित्रपटगीते सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हार्मोनिअम आणि तबला वादनाने कार्यक्रमात रंगत आणली.

त्यानंतर राग मलकंसमध्ये मुखमोर ही बंदिश आणि त्यावर आधारित मन तरपत, ना मानोंगे तो, आधा है चंद्रमा, अणुरेणिया थोकडा, आए सूर के पंछी आए ही गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. तुषार रिठे यांनी धन्य भाग सेवा का ही भैरवी सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्नदा रिठे आणि मयूर मस्के यांनी केले.