पिंपळेगुरव परिसरातील तुळजाभवानी, कान्होबा मंदिरात चोरी  

0
740

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – तुळजाभवानी मंदिर, कान्होबा मंदिराच्या दरवाज्याचा कडी –कोयंडा उटकटून चोरट्यांनी मंदिरातील मुर्ती, दिवा, आरती, समई, घंटा दानपेटीतील रोकड असा ३२ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरूवारी (दि. २०) मध्यरात्री पिंपळेगुरव  परिसरात मध्यरात्री घडली.

पिंपळेगुरव येथील तुळजाभवानी मंदिरातील चोरीप्रकरणी अक्षय अनिल साळवे (वय.२३ रा. लक्ष्मीनगर, पिंपळेगुरव) या तरूणाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी स्वप्निल श्रीकांत कदम (वय.२६ रा. पिंपळेगुरव ) यांने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय यांने गुरूवारी रात्री पिंपळेगुरव येथील मंदिराच्या लोखंडी दरवाज्याचे कुलूप तोडून एक पितळी दिवा, आरती, चार समई, एक एलईडी टीव्ही, पितळी घंटा असा १३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

कान्होबा मंदिर चोरीप्रकरणी पुजारी सुर्यकांत ज्ञानोबा देवकर (वय ६० रा. नेताजीनगर, पिंपळेगुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुजारी देवकर हे गुरूवारी रात्री मंदिराला कुलूप लावून गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचे कुलूप तोडून मंदिरातील मूर्ती, पितळी तांब्या, पुजेचे साहित्य, दानपेटीतील रोकड असा १९ हजारांचा मुद्देमाल लांबविला.

अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.