पिंपरी-चिंचवड पालिकेच्या प्रवेश द्वारातील सॅनिटायझर झालं गायब?

0
234

पिंपरी, दि.१५ (पीसीबी) : पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेला श्रीमंत महापालिकेचा दर्जा आहे .येथे,नगरसेवक, अधिकारी पदाधीकारी ,पत्नकार , कर्मचारी नागरीकांची, कामा निमित्त सदैव रहदारी असते.

नविन करोनाचे सावट असताना शिवाय कोरोनाचे संकट अजुन टळलं नसताना पालिकेकडुन नागरीकांना सतत सॅनीटायझरचा वापर करण्याबाबत, स्वच्छतेचे पालन करण्या बाबत,मास्कचा वापर करण्याबाबत ,सुरक्षीत अंतर ठेवण्याबाबत सुचना दिल्या जातात. त्यात सर्वप्रथमचे स्थान असलेले सॅनिटायझर महत्वाचे असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर असणारे सॅनिटायझरदोन ते तीन दिवस अचानक गायब झाल्याने नागरीकांच्या स्वास्था बद्दल शासनाकडुन हलगर्जीपणा केले जात असल्याचे पितळ उघडकीस आले आहे.. नागरीकांच्या स्वास्था बद्दल प्रशासनाकडुन हलगर्जीपणा का होत आहे ? असा प्रश्न पडल्या शिवाय रहात नाही. शिवाय पालिकेत ये-जा करणा-.या आरोग्य खात्याचेही हे लक्षात न येणे दुर्दैवआहे.. , त्यामुळे पिंपरी -चिंचवडच्या जनतेच्या जिवीशी खेळणे प्रशासनाने बंद करावे, प्रवेशद्वारात सॅनिटायझरची योय करावी .श्रीमंत पीलीकेत सॅनीटायझर बाबत वाणवा (गरीबी )दाखवु नये ,अन्यत: पिंपरी चिंचवड कोरोनामुक्त म्हणुन घोषीत करावे अशा प्रतीक्रीया उमटताना दिसत आहेत.