पिंपरी-चिंचवडमध्ये कष्टकऱ्यांचे पहिले साहित्य संमेलन; अध्यक्षपदी डॉ . भालचंद्र कांगो यांची निवड

0
718

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – कष्टकरी संघर्ष महासंघ आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित महाराष्ट्र असंघटित कष्टकरी कामगार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ विचारवंत आणि कामगार नेते डॉ. कॉ. भालचंद्र कांगो यांची निवड करण्यात आली आहे. जेष्ठ महिला कष्टकरी सुरेखा कदम यांच्यासह सर्व महिलांनी त्यांना निवड़ीचे सोमवारी (दि. २१) पत्र दिले.

यावेळी सविता किट्टे, छाया कांबळे, शांताबाई जाधव, शकुन्तला जाधव, नागुबाई हळनोर, खातुनबी शेख, महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, साईनाथ खान्दिझोड, इरफान चौधरी, आबा शेलार, सैफुल शेख, प्रकाश साळवे, तुकाराम माने, सखाराम केदार, कासिम तंबोळी आदी उपस्थित होते

कष्टकरी संघर्ष महासंघ आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आयोजित सदरच्या साहित्य संमेलनात श्रमिकांच्या जीवनाला साहित्यात प्रतिबिंबित करणे आणि लेख, कविता, स्मरणिकाच्या माध्यमातून चळवळीला बळ देत सर्वच कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तरे शोधून त्याना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ आणि स्वावलंबी बनवणे हा या संमेलानाचा मुख्य हेतू आहे. ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, स्वागताध्यक्ष काशिनाथ नखाते, कामगार नेते शिवाजीराव खट्काळ, सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे डॉ. सतीश सिरसाठ, मुंबईचे उदय चौधरी, नाशिकचे तुकाराम धांडे, असंघटित कामगार नेते नितिन पवार, नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, दिलासा संस्थेचे सुरेश कंक यांच्यासह विविध मान्यवर संमेलनाला उपस्थित असणार आहेत .