राहुल गांधी महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढवणार ?

0
1516

मुंबई, दि. २१ (पीसीबी) –  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासाठी नांदेडचा मतदारसंघ राखीव ठेवण्यात आला आहे, असे वृत्त एका वृत्तवाहिनी दिलेले आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी  दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी राहुल गांधींसमोर एकूण ३ मतदारसंघाचा  पर्याय  ठेवण्यात आला आहे. यामध्ये नांदेड, अमेठी आणि मध्य प्रदेशातील एका मतदारसंघाचा  समावेश आहे.

नांदेड  हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेत भल्या-भल्यांना पराभवाचा फटका बसला होता. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  अशोक चव्हाण   निवडून आले होते. त्यामुळे  नांदेड हा काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ  असल्याने राहुल गांधी येथून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.