पिंपरीतील हितेश मुलचंदानी खून प्रकरणी आणखी दोघे ताब्यात

0
937

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – हितेश मुलचंदानी खून प्रकरणी खंडणी दरोडा विरोधी पथकाने दापोडी येथून अरबाज मुन्ना शेख (वय २०, रा. खडकी बाजार पुणे) आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी यापूर्वीच अक्षय संजय भोसले उर्फ लिंगा (वय २५, रा. शितोळे नगर, जुनी सांगवी), योगेश विठ्ठल टोणपे उर्फ लंगडा (वय २०, रा. जगताप चाळ, पिंपळे गुरव), आमिन फिरोज खान (रा. मोमिनपुरा, गंजपेठ, पुणे) यांना तिघांना अटक केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश मुलचंदानी खून प्रकरणातील आरोपी अरबाज शेख दापोडी येथील आत्तार वीट भट्टी जवळ थांबला असल्याची माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून अरबाज आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या दोघांनाही पिंपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. हितेशचा खुन करण्याआधी त्याचे सुमो या गाडीतून अपहरण करण्यात आल्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. पिंपरी पोलिस अधिक तपास करत आहेत.