पार्टीत जेवणासाठी ठेवलेलं मटण संपल्याने कार्यकर्त्यांमध्ये तुफान मारामारी

0
1832

सांगली, दि.१० (पीसीबी) – तासगावात युवानेत्याच्या वाढदिवस पार्टीत जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वाढदिवसानिमीत्त आयोजित केलेल्या पार्टीत कार्यकर्त्यांनी एकमेकांना तुडवत लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे.

पार्टीत जेवणासाठी ठेवलेलं मटण संपल्याने कार्यकर्त्यांमध्ये आणि पार्टीला आलेल्या दोन नगरसेवकांमध्ये वाद सुरू झाला, असल्याची माहिती समोर आली आहे.

मटण संपलं म्हणून एकमेकांशी वाद घालणारे दोन्ही नगरसेवक एकाच पक्षाचे असून वाद वाढल्याने दोघांनीही पार्टीत एकमेकांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

दरम्यान, विशेष म्हणजे ज्याचा वाढदिवस होता त्या युवानेत्यालाही मारहाण केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.