पाण्याच्या बादलीत पडून एक वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

0
274

थेरगाव, दि. ४ (पीसीबी) – आई, वडील घरी झोपले असताना एक वर्षाचा चिमुरडा रांगत रांगत पाण्याने भरलेल्या बदलीजवळ केला. पाणी खेळताना त्याचा बादलीत तोल गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २) दुपारी समता कॉलनी, थेरगाव येथे घडली.

मोहम्मद फैसल तारीक खान (वय १) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तर प्रदेशातील मोहम्मद तारीख हरीश खान (वय २९) आणि जोहराजबी खान (वय २५) हे दाम्पत्य त्यांच्या दोन मुलांसह समतानगर काॅलनी येथे भाडेतत्त्वारील एका खोलीत वास्तव्यास आहेत. तारीख खान हे काचेचे दुकान चालवतात. तर त्यांची पत्नी जोहराजबी गृहिणी आहेत.

तारीख आणि त्यांच्या पत्नी जोहराजबी दोन्ही मुलांसह गुरुवारी दुपारी घरात झोपले होते. त्यावेळी एक वर्षाचा फैसल हा झोपेतून उठून रांगत मोरीमध्ये गेला. तेथे प्लास्टिकच्या २० लिटरच्या बादलीमध्ये पाणी होते. पाणी खेळत असताना फैसल बादलीत पडला. काही वेळाने जोहराजबी उठल्या असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी फैसलला तात्काळ उपचारासाठी थेरगाव मधील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान फैसलचा मृत्यू झाला.