पाण्याची पाईपलाईन सरकावल्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग

0
204

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पाण्याची पाइप लाइन सरकवल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एका महिलेसह चार जणांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माण येथे 24 मे रोजी सायंकाळी घडली.

बाबू लारा माने, महेश लारा माने, राजू (पूर्ण नाव माहिती नाही) आणि एक महिला, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पिडित महिलेने बुधवारी (दि. 26) हिंजवडी पोलीस ठाण्यात विनयभंगाची फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ग्रामपंचायतीची पाइप लाइन कोणीतरी सरकवली. या कारणावरून आरोपी आणि फिर्यादी महिला यांच्यात भांडण झाले. त्यावेळी आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करीत विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक बोरकर याबाबत अधिक तपास करीत आहेत.