अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; एकाला अटक

0
251

पिंपळे निलख, दि. २७ (पीसीबी) – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बावधन आणि पिंपळे निलख येथे घडली.

चेतन विवेक ओव्हाळ (वय 24, रा. पिंपळे निलख. मूळगाव देगाव, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडित अल्पवयीन मुलीने बुधवारी (दि. 26) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना फेब्रुवारी 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत गोल्डन लॉज, बावधन आणि पिंपळे निलख येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओव्हाळ याला फिर्यादी या अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही त्यांच्या अज्ञातपणाचा गैरफायदा घेत लैंगिक अत्याचार केले. सध्या फिर्यादी या पाच महिन्याच्या गरोदर असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक निरीक्षक खाडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.