पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरूणाचा बुडून मृत्यू

0
480

खुलताबाद, दि.२ (पीसीबी) – वेरूळ येथील पार्श्वनाथ मंदिर रस्त्याच्या जवळील पाण्याच्या डोहामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू  झाल्याची  धक्कादायक घटना घडली आहे. ही  घटना मंगळवारी दुपारी घडली.

अमोल बाबासाहेब भुसारे (वय २२ रा. टोकी, ता. गंगापूर) असे त्या बुडून मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल हा वेरूळ येथील पार्श्वनाथ मंदिर रस्त्याच्या जवळील पाण्याच्या डोहामध्ये पोहण्यासाठी गेला असता त्याला पाण्याच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अशी माहिती वर्तवण्यात येत आहे. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून, खुलताबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल वाल्मिक कांबळे करीत आहेत.