पाटील म्हणतात उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं?

0
337

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : शिष्टाचारानुसार कोणत्याही केंद्रीय मंत्र्यांना अटक करता येत नाही, असं सांगतानाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर म्हणाले होते. मग त्याचं काय करणार?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलताना हा सवाल केला. केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात येत नाही. पहिल्यांदाच तुम्हाला बातमी देतोय. देशाच्या शिष्टाचारानुसार क्रम सांगायचा तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती , पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांना कोणतंही राज्य सरकार अटक करू शकत नाही. या सरकारचं गेल्या 20 महिन्यात काय चाललंय? कोण यांना सल्लागार मिळाला माहीत नाही. कोर्टात ते प्रत्येक विषयावर फटके खात आहेत. तसं आता खातील, असं सांगतानाच शिवसैनिकांनी केस दाखल करणं समजू शकतो. पण अटक? मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते. तेव्हा पंढरपुरला मोदींना पंतप्रधान असताना चोर म्हणाले. त्याचं काय करायचं? मुख्यमंत्री असताना दसरा मेळाव्यात त्यांनी जे भाषण काढा. त्यावर किती केसेस दाखल करायच्या?, असा सवाल त्यांनी केला.

राणेंची एक कार्यपद्धती आहे. त्यांची बोलण्याची स्टाईल आहे. रावसाहेब दानवेंची एक बोलण्याची स्टाईल आहे. त्यातून समजा एखादा आक्षेपहार्य शब्द आला असेल तर थेट केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला अटक? त्याला काही समज देणं किंवा त्याच्यावर म्हणणं हे असं शकतं. एखाद्या नेत्याने प्रतिक्रिया दिल्यावर त्यावर बोलणं हा प्रघात आहे. पण त्यावर लगेच गुन्हा दाखल करा आणि अटक…? ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे ते पेंडिग आहेत. संजय राठोडचं काय झालं? कुठे अडलं? राष्ट्रवादीच्या युवा नेत्यावर बलात्काराचा आरोप आहे त्याचं काय झालं?, असे सवालही त्यांनी केले.
गेल्या 20 महिन्यात जे सुडबुद्धीने सुरू आहे. त्याची यादी करत आहे. ते कशात बसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय जीवन सुसंस्कृत होतं. त्यावर काय चालू आहे. राज्यातील सर्व पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रं बसून चर्चा केली पाहिजे, असं सांगतानाच मी राणेंच्या वाक्याचं समर्थन करत नाही. पण त्यांची शैली आहे. कोकणात ज्या पद्धतीने बोललं जातं तो अनादर नसतो, असं ते म्हणाले.
विनायक राऊत या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आहेत. नीलम गोऱ्हे कोणत्या कॅपेसिटीतून बोलत आहेत? विधान परिषदेच्या उपसभापतींना पक्ष नसतो. गेल्या दोन चार महिन्यातील त्यांचे आर्टिकल्स आम्ही काढून कोर्टात जाणार आहोत. हे स्थान हे पक्षविरहीत असताना त्या पक्षाच्या पदाधिकारी म्हणून त्या कशा बोलू शकतात, असंही ते म्हणाले