पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिल्या मोदींना शुभेच्छा

0
330

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – देशात पुन्हा एकदा मोदी सरकार  सत्तेवर येणार आहे. याबद्द्ल  जगातील विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांकडून मोदींना शुभेच्छा संदेश येण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (रविवार)  फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी  दोन्ही देश लोकांच्या भल्यासाठी मिळून काम करतील, अशी अपेक्षा इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.

इम्रान खान यांनी मोदींना फोन  करून लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पाकिस्तान विदेश मंत्रलयाकडून याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामध्ये मोदींसोबत काम करण्याची इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही देशांत शांतता आणि समृद्धीसाठी हिंसामुक्त, दहशतवादमुक्त वातावरणाची खूप आवश्यकता आहे,  असे प्रत्युत्तर नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांना दिले.

पुलवामा हल्ला आणि एअरस्ट्राइकनंतर दोन्ही देशाच्या पंतप्रधानांमध्ये पहिल्यांदाच फोनवर चर्चा झाली. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी  ट्विट करून ही माहिती दिली.  दक्षिण आशियात शांतता, विकास आणि समृद्धीसाठी इम्रान खान पंतप्रधान मोदींसोबत काम करण्यास इच्छुक आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.