पद्मश्री नामदेवदादा ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त कनेरसर येथे साहित्य संमेलन

0
117

पिंपरी, दि. १ (पीसीबी) साहित्यिक पद्मश्री नामदेवदादा ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त दि.१५ फेब्रुवारी रोजी दलित पँथर महाराष्टराज्य व कुलस्वामिनी साहित्य परिषद यांच्या वतीने साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.हे संमेलन कुलस्वामीनी कार्यालय,कनेरसर येथे संपन्न होत आहे. या संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.श्रीपालजी सबनीस, संमेलनाध्यक्ष ढसाळ यांच्या पुर गावातील ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे हे आहेत अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष, साहित्यिक अशोकराव टाव्हरे यांनी दिली.

संमेलनासाठी सन्माननीय अतिथी म्हणून उत्पादनशुल्क मंत्री  ना. शंभुराजे देसाई व अनेक मान्यवर मंत्री तसेच नामदेवदादा ढसाळांवर प्रेम करणारे नामवंत साहित्यिक, साहित्यप्रेमी ,चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे संमेलनाचे संयोजक,दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष पॅंथर सुखदेव तात्या सोनवणे यांनी सांगितले.एमआयटी विश्व विद्यापीठाचे संस्थापक प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड यांनी संमेलनास शुभेच्छा दिल्या आहेत.

संमेलनाबाबत  आढावा बैठक  आयोजित करण्यात आली होती.त्यास निमंत्रक दलित पँथरचे युवक प्रदेशाध्यक्ष शुभम सोनवणे,संयोजन समिती अध्यक्ष दिलीपराव माशेरे,उपाध्यक्ष प्रशांत म्हसुडगे,ज्येष्ठ साहित्यिक  राजेंद्र सोनवणे, संतोष गोगावले ,योगेश रणपिसे,सुरेखा टाव्हरे व सदस्य उपस्थित होते.

पदमश्री नामदेवदादा ढसाळ यांनी विद्रोही कवी,साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळविला होता,त्यांच्या प्रभावी  लेखनाने क्रांती केली होती.दलित पँथरच्या माध्यमातून वंचितांना न्याय मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोठे असून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठीचे साहित्य संमेलन ही प्रेरणादायी बाब असल्याचे मत  यावेळी पॅंथर शुभम सोनवणे यांनी व्यक्त केले.या साहित्यसंमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहान संयोजन समितीने केले आहे.