पक्षाला आता माझी गरज नाही असे वाटतंय

0
402

मुंबई, दि.४ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला पक्षांतराचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत तरीही कॉंग्रेसचे नेते बंडखोरी करताना दिसत आहेत. असाचं एक नेता कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना नाराज असलेला दिसून येत आहे.

मुंबई कॉंग्रेसचे जेष्ठ नेते संजय निरुपण हे पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर नाराज असलेले दिसत आहेत. संजय निरुपम यांनी एक ट्वीट करून आपली नारजी व्यक्त केली आहे. ‘मुंबईतून सुचविलेल्या एकाही उमेदवाराला उमेदवारी न मिळाल्याने निरुपम नाराज झाले आहेत. ज्या पद्दतीने पक्ष नेतृत्त्व मला वागणूक देत आहे ते पाहता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा दिवस लांब आहे असे वाटत नाही असे त्यांनी म्हटले आहे.