पकडलेले ५० लाख कोणाचे होते? हे हर्षवर्धन जाधवांनी सांगावे – चंद्रकांत खैरे

0
462

औरंगाबाद, दि. ४ (पीसीबी) – भाजप प्रदेशाध्यक्ष  रावसाहेब दानवे यांनी  हर्षवर्धन जाधव यांना निवडणुकीत रसद पाठवली, असा नवा आरोप शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज (शनिवार) केला आहे.  ५० लाख रुपये पकडले होते, ते कोणाचे होते, हे हर्षवर्धन यांनी सांगावे, असेही खैरे म्हणाले आहेत.  दानवे  हर्षवर्धन यांना रोज पैसे पाठवत होते. मी याचा आढावा घेतला आहे, असेही खैरे यांनी म्हटले आहे.

रावसाहेब दानवे यांनी युती धर्मऐवजी जावई धर्म पाळला, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. चंद्रकांत खैरे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे तक्रार  केली आहे.

दरम्यान,  हर्षवर्धन जाधव यांची प्रचारादरम्यानची एक क्लिप व्हायरल झाल्याने  दानवे अडचणीत आले आहेत. हर्षवर्धन जाधव यांचा प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे. दानवेंनीच पूर्ण भाजप माझ्यामागे उभे करण्याचे आश्वासन दिले होते, असा दावा हर्षवर्धन जाधवांनी केल्याचे या व्हिडीओमध्ये  दिसत आहे.