“पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि त्यामुळे….”; मनसे आक्रमक

0
264

मुंबई, दि.२० (पीसीबी) : तौते चक्रीवादळाने मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीला जोगदार दणका दिला हे. महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीवरून विरोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदतीची मागणी करत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यानी मोतोश्रीच्या बाहेर पडून राज्यात फिरून करोना परिस्थिचा आढावा घ्यावा, अशी टीका देखील करताना दिसत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसल्यानंतर पाहणी केली आणि गुजरातला १ हजार कोटींचा मदतनिधी जाहीर केला. यावरून आता मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे या दोघांवरही ताशेरे ओढलेत.

“पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावे. म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असे वाटेल. पंतप्रधान येऊन गेले तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्रात फिरतील,” असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

पंतप्रधानांनी देशभरात तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत केंद्राने जाहीर केली आहे. तसेच गुजरातमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीसाठी त्यांनी १०, हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. मात्र, नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासोबत दुजाभाव केल्याचा आरोप विरोधक करत आहेत.