नोटांवरुन महात्मा गांधींचे छायाचित्र हटवा; मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचे वादग्रस्त ट्विट   

0
472

मुंबई, दि. २ (पीसीबी) – चलनी नोटांवरुन महात्मा गांधी यांचे फोटो हटवण्याची मागणी करून  ट्विटरवर नथुराम गोडसे याचे आभार मानल्यामुळे मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी  यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. तर ट्वीट वादग्रस्त ठरत असल्याचे लक्षात येताच निधी चौधरी यांनी ट्वीट डिलीट करुन  वादावर पडदा टाकण्याचा  प्रयत्न केला आहे.

‘150 व्या जयंती वर्षाचा अत्यंत जल्लोष सुरु आहे. (रडणारी इमोजी) आता वेळ आली आहे. त्यांचा चेहरा चलनी नोटांवरुन हटवण्याची, जगभरातून त्यांचे पुतळे हटवण्याची, त्यांच्या पश्चात रस्ते आणि संस्थांना दिलेली नावे बदलण्याची, तीच आपल्या सर्वांकडून खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद गोडसे. 30.01.1948’ अशा आशयाचे इंग्रजी ट्वीट करुन निधी चौधरींनी सोबत महात्मा गांधींच्या पार्थिवाचा फोटो जोडला होता.

१७ मे रोजी केलेले आपले ट्वीट वादाला कारणीभूत ठरत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ते ट्वीट डिलीट केले. त्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी काही ट्वीट्स केली आहेत.  काही लोकांचा गैरसमज झाल्यामुळे मी गांधीजींबाबतचे ट्वीट डिलीट केले आहे. तुम्ही २०११ पासून माझी टाईमलाईन पाहिलीत, तर त्यांना समजेल, की मी गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.