नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता

0
816

काठमांडू, दि. ८ (पीसीबी) – नेपाळमधील गोरखा जिल्ह्यात काठमांडूला जाणारे हेलिकॉप्टर आज (शनिवारी) सकाळी कोसळले. या अपघातात पायलटसह ७ प्रवाशी बेपत्ता झाले आहेत. या अपघातातील बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्‍यात आले आहे.

आज सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांला ९ एन-एएलएस हेलिकॉप्टर संपर्क कक्षेच्या बाहेर गेले.  या हेलिकॉप्टरमध्ये १ जपानी पर्यटकासह ५ नेपाळी प्रवाशी होते. काठमांडूपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या धडिंग जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले.

नेपाळच्या पोलिसांनी सांगितले की, हेलिकॉप्टर संपर्क कक्षेच्या बाहेर गेले. तेव्हा ते बार नुवाकोट आणि धडिंग जिल्ह्याच्या बॉर्डरवर होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष सत्यवती भागात आढळल्याची माहिती नेपाळ हवाई वाहतूक खात्याने दिली आहे. सत्यवती हे ५५०० फूट उंचीवर आहे. तसेच या परिसरात घनदाट जंगल आहे. खराब हवामानामुळे शोधमोहीमेत  अनेक अडथळे येत आहेत.