नेत्यांच्या पक्षांतराने खचून जाऊ नका, खंबीर राहा; शरद पवारांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन  

0
384

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – राष्ट्रवादीतील नेत्यांच्या पक्षांतराने खचून जाऊ नका, खंबीर राहा, सर्व पक्ष तुमच्या पाठिशी उभा आहे.  परिसरातील जनहिताची कार्ये सुरू ठेवा असा,  असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना  केले आहे.  

राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते पक्षाला रामराम करून भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या पार्श्वभूमीवर वरळीतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी बोलताना पवार यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना धीर दिला.

यावेळी शरद पवार यांनी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच कार्यकर्त्यांकडून परळी विधानसभा मतदारसंघातील सद्यस्थितीची माहिती जाणून  घेतली. तसेच कार्यकर्त्यांनीही त्यांची गाऱ्हाणी पवार यांच्यापुढे मांडली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळतीसत्र कायम आहे. मुंबई अध्यक्ष सचिन आहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीदेखील पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता विदर्भातील  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक हे लवकरच शिवसेनेत प्रवेश  करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.