भाजपचा सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन देणे होय -आशिष शेलार

0
686

नागपूर, दि. २७ (पीसीबी) – भाजपचा सदस्य होणे म्हणजे  देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासह सीमेपलीकडेही देशाचे वर्चस्व कायम करण्याला समर्थन देणे होय.  भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीलाही समर्थन देणे होय, असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी  म्हटले  आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी, बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भाजपच्यावतीने  करण्यात आला. यावेळी शेलार बोलत होते.

यावेळी शेलार म्हणाले की, भाजपचा सदस्य होणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देश मजबूत करण्याच्या कार्याला समर्थन देणे होय.

भाजप  हा कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे. त्यामुळे संघटनेचा विस्तार करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे, असे ते म्हणाले.  यावेळी त्यांनी भाजपच्या सदस्यता नोंदणीचा क्रमांक जाहीर करीत सदस्यता घेणाऱ्या दोन सदस्यांचा सत्कार केला. कार्यकर्त्यांनी वस्त्या, गल्ली व चाळीत जाऊन अधिकाधिक सदस्य बनवावे,  असे आवाहन शेलार यांनी यावेळी केले.