निवडणुकीच्या खर्चासाठी भाजप नेत्यांच्या पत्नी आपले दागिने विकतात का? – कमलनाथ

0
468

भोपाळ, दि. २९ (पीसीबी) – भाजपकडे लोकसभा निवडणूकांवर खर्च करण्यासाठी पैसे नेमके येतात कुठून? निवडणूक निधीची सोय करण्यासाठी आणि हा सर्व खर्च भरुन काढण्यासाठी भाजप नेत्यांच्या पत्नी त्यांच्या दागिन्यांची विक्री करतात का?,  असा सवाल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी   केला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कमलनाथ पुढे म्हणतात की,  मी मोदींना विचारु इच्छितो की, त्यांच्या विमान प्रवासासाठी खर्च केले जाणारे पैसे, मध्य प्रदेश विधानसभा निवडणूतांसाठी खर्च करण्यात आलेले पैसे आणि आता लोकसभा निवडणुकीसाठी खर्च करण्यासाठी पैसे नेमके येतात कोठून? असा वादग्रस्त प्रश्न कमलनाथ यांनी केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्यावर  विरोधी पक्षनेत्यांकडून जातीच्या राजकारणाचे आरोप करण्यात येत असतानाच दुसरीकडे  कमलनाथ यांनी पुन्हा एकदा भाजप आणि मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.  कमलनाथ यांच्या या प्रश्नामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फोडण्याची शक्यता आहे. तर यावर भाजप  काय  प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.