शिरुरमध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
644

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज (सोमवार) राज्यात होणाऱ्या निवडणुकीत शिरुर मतदार संघात तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करण्यासाठी चांगलीच आघाडी घेतल्याचे समोर आले.

आज पहाटे सात पासूनच तरुणांच्या बरोबरीने ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. यामुळे शिरुरमतदार संघातील मासुळकर कॉलनी, अजमेरा, उद्यमनगर, नेहरुनगर, विठ्ठलनगर, यशवंतनगर येथे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. आज पहाटे सात ते नऊच्या दरम्यान संपूर्ण शिरुर मतदार संघात एकूण ६.३२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर वाढत चाललेल्या उन्हामुळे दुपारी मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता आहे. तसेच दुपारी चार नंतर पुन्हा चांगले मतदान होईल असा अंदाज निवडणुक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.