निर्भयाच्या आरोपींना फाशीच; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

0
564

नवी दिल्ली, दि.१८ (पीसीबी) – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीची पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. मात्र, आरोपी अक्षयने राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यासाठी न्यायालयाकडे दोन आठवड्यांचा कालावधी मागितला.

आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. मात्र, आरोपी अक्षयने राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यासाठी न्यायालयाकडे दोन आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. परंतु, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आरोपीच्या मागणीला विरोध केला आहे. याप्रकरणात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सांगितले आहे.