नितीन गडकरींच्या गावात भाजपला धक्का; ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसची बाजी

0
973

नागपूर, दि. २७ (पीसीबी) – केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवाडा गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा काँग्रेसने दारूण पराभव करून मोठा धक्का दिला आहे. गडकरी यांनी  दत्तक घेतलेले पाचगाव या  ठिकाणी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसने  वर्चस्व मिळवले आहे. धापेवाडा येथे १७ पैकी भाजपचा एकही सदस्य निवडून आलेला नाही. 

मुख्यमंत्र्यांनी दत्त घेतलेल्या फेटरी गावात आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुरादेवी या गावातसुद्धा गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला होता. त्यामुळे भाजपचा ग्रामीण भागातील  जनाधार कमी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

धापेवाडा येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत सुरेश डोंगरे यांनी भाजप पुरस्कृत संजय शेंडे यांचा पराभव केला आहे. तर पाचगाव येथे काँग्रेसच्या उषा गंगाधर ठाकरे यांनी भाजप समर्थित रजनी लोणारे यांचा पराभव केला आहे.

.