नासाच्या ‘पार्कर सोलार प्रोब’ यानाची सूर्याच्या दिशेने झेप

0
915

फ्लोरिडा, दि. १२ (पीसीबी) – नासाचे पार्कर सोलार प्रोब या यानाने सूर्याच्या दिशेने यशस्वी झेप घेतली.  इतिहासात पहिल्यांदाच एक अंतराळ यान सूर्याच्या दिशेने झेपावले आहे. हे यान सात वर्षांत सूर्याला सात प्रदक्षिणा घालणार आहे. या यानाचा ताशी वेग ४ लाख ३० हजार किमी इतका असून २५०० डिग्रीची उष्णता झेलण्याची क्षमता या यानामध्ये आहे.

१०३ अब्ज डॉलर खर्च करून तयार केलेले हे यान काही दिवसांत सूर्याजवळ पोहोचेल. या यानातील आणि सूर्यातले अंतर केवळ चाळीस लाख मैल असणार आहे. सूर्याची उष्णता, सूर्याजवळील वातावरणात दररोज होणारे बदल, अंतराळातील हालचाली या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण होण्यासाठी या यानात हिट शिल्डही बसवण्यात आले आहे. अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ यूजीन नेवमॅन पार्कर यांचे नाव या यानाला दिले आहे.