नाशिकमध्ये  सरसंघचालक मोहन भागवत दाखल

0
403

मुंबई, दि.२१ (पीसीबी)- राज्यातील सत्तेचा पेच अद्यापही कायम आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने राज्यभरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडून तातडीने मदत उपलब्ध व्हावी, अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.  केंद्रीय पथक अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  सरसंघचालक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. येथील  द्राक्ष निर्यातदार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी ते नुकसानीसंदर्भात ते चर्चा करणार आहेत.  तसेच आज सकाळी त्यांनी नाशिकमधील संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवक व पदाधिकाऱ्यांची चर्चा केली असल्याचेही सांगितले जात आहे.

अवकाळी पावसामुळे राज्यभरासह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झालेले आहे. याबाबत सरसंघचालक अधिक माहिती ते जाणून घेत आहेत. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे अवकाळी पावसामुळे जवळपास ५० हजार हेक्टरवरील द्राक्ष बागांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. अनेक द्राक्ष बागा पुर्णतः उद्धवस्त झाल्या आहेत. येथील शेतकऱ्यांचा पुढील हंगाम देखील संकटात आला असल्याची माहिती आहे.

याचबरोबर सरसंघचालक पुढील तीन दिवस नाशिकमध्ये महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात अशा पश्चिम क्षेत्रातील राज्य आहेत, येथील ज्येष्ठ स्वयंसेवकांसह संघ पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगितले जात आहे. चार दिवसीय दौऱ्यासाठी बुधवारी रात्री उशीरा सरसंघचालक नाशिकमध्ये दाखल झाले असल्याची माहिती आहे. एका वृत्तवाहिनीने