नवमतदारांसाठी ट्विटरची #Powerof18 मोहीम; मतदानासाठी तरूणाईला उद्युक्त करण्याचा प्रयत्न

0
586

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – देशातील तरूणांना निवडणुकीत मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ट्विटरनेही #Powerof18 अशी मोहिम सुरू केली आहे. त्या माध्यमातून तरूणाईला मतदानासाठी उद्युक्त करण्यावर ट्विटर भर देणार आहे. ट्विटर #Power18 या मोहिमेअंतर्गत नव मतदार तरूणाईला निवडणुकांबद्दल माहिती देण्याचा तसेच मतदानाच्या सामाजिक जाणिवेबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे. ट्विटरची ही मोहीम सीईओ जॅक डोरसी आणि माया हरी यांनी लॉन्च केली आहे. या मोहिमेसंदर्भात आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांसोबत विशेष चर्चासत्रही घेण्यात आले होते.