धनंजय मुंडे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल

0
576

मुंबई, दि. १० (पीसीबी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तीव्र पोटदुखीचा त्रास गेल्या काही दिवसांपासून त्यांना होतो आहे. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या धनंजय मुंडे यांनी प्रकृती स्थिर आहे लवकरच पुन्हा सेवेत दाखल होईन असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.

जून महिन्यात धनंजय मुंडे यांना करोनाचीही लागण झाली होती. त्यावेळीही त्यांनी मुंबईच्या रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर ते करोनामुक्त झाले. आता त्यांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीचा त्रास होतो आहे. त्यामुळे उपचारांसाठी आता त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.