धक्कादायक: हवेलीत क्षुल्लक कारणावरून वृध्दाची जीभ तोडून खून

0
555

पुणे, दि. २५ (पीसीबी) – हवेली तालुक्यातील कोलवडी गावात एका वृद्धाला क्षुल्लक कारणावरून तरुणाने जबर मारहाण करत त्यांची जीभ तोडली त्यानंतर त्यांचा खून केला. ही धक्कादायक घटना आज (सोमवार) दुपारच्या सुमारास घडली.

तुकाराम निवृत्ती साळुंके (वय ७०, कोलवडी ता. हवेली) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुरेशकुमार शिवशरण पासवान (वय २२ वर्षे, रा. उंद्रे वस्ती, मूळगाव- पखरौली फतेहपूर, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षुल्लक कारणावरून सुरेशकुमार याने दारु पिऊन वृध्द साळुंखे यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन त्यांची जीभ तोडली. त्यानंतर त्यांना जबर मारहाण करुन त्यांचा खून केला. सुरेशकुमार पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केले. पोलीस उपनिरीक्षक उत्तमराव सस्ते तपास करत आहेत.